Saturday, October 10, 2009

असं का?

फांदी फांदी झुलतेय का?
ताल कोणी धरतंय का?
काकणं किणकिण किंकिंतायत,
कळशीत पाणी भरतंय का?

सुवास असं घाम्घाम्तोय,
झाड फुलात गढलय का?
वारा गाणं का म्हणतोय?
प्रेमात कोणी पडलंय का?

1 comment:

  1. माझ्या कडे बऱ्याच कविता आहेत पाडगांवकरांच्या टाइप करुन ठेवलेल्या, ( मराठित) तुम्हाला हव्या असल्यास मला मेल करा .. मी तुम्हाला पाठवुन देईन..

    ReplyDelete