भातुकलीच्या खेळामधली ...
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी
राजा वदला, "मला समजली शब्दावाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा"
कां राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी?
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी
राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तार
"उद्या पहाटे दुसर्या वाटा, दुज्या गावचा वारा"
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी
तिला विचारी राजा, "कां हे जीव असे जोडावे?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?"
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी
कां राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना?
वार्यावरती विरून गेली एक उदास विराणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
एकदम सहमत.मी तर म्हणेन "जीवनातला जीवंत कवी"
ReplyDeleteश्रीकृष्ण सामंत.
खुप छान काम केलेत. पूर्ण कवित दिली आणि तीही कॉपी करण्यासारखी. आभार.
ReplyDeleteMast...
ReplyDelete동전 방 앹앹신: 5 Best PS1 Online Casinos in 2020 우리카지노 계열사 우리카지노 계열사 happyluke happyluke 온라인카지노 온라인카지노 クイーンカジノ クイーンカジノ 우리카지노 쿠폰 우리카지노 쿠폰 카지노사이트 카지노사이트 dafabet link dafabet link ラッキーニッキー ラッキーニッキー sbobet ทางเข้า sbobet ทางเข้า ミスティーノ ミスティーノ 194 Tastes of Tastes of Tastes of Tastes of Tastes of Tastes of Tastes
ReplyDelete