रडतच आलो येताना,पण हसत जावे जाताना
अंगावर आसूड विजेचे
झेलून घेती घन वर्षेचे
सार्थक झाले कोसळण्याचे,तृषित धरित्री न्हाताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना
हसत हसत ज्योई जळली
काळोखाची रात्र उजळली
पाहत झाली तेव्हा नव्हती,तेजोमय जग होताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना
बीज आतुनी फुटून गेले
वेदनेत या फुल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे,मरण झेलुनी घेताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना
कुणी दुखाचा घोट घेतला
खोल व्यथेने प्राण पेटला
त्या दुखाचे झाले गाणे,जीव उधळूनी जाताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment