Sunday, September 27, 2009

सोबत...


अवतीभोवती कोणीच नसेल,
काळाकुट्ट काळोख असेल!
पायापुढची वाटसुद्धा दिसणार नाही,
'ओ'द्यायला कोणीसुद्धा असणार नाही!
प्रत्येक पाउल हरलेले,
जग उलट फिरले!

शरण न जाण्याची
हीच वेळ असते;
आपले आपण असण्याची
हीच वेळ असते!

अशा वेळी छातीवरती
ठेवा आपला हात,
''भिऊ नको!मी आहे!''
म्हणेल कोणी आत!

No comments:

Post a Comment