Tuesday, September 22, 2009

गाणं जगण्याचं!

मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?
जीव जडून प्रेम करायचं कोणी थांबतं का?

कशासाठी भयाने ग्रासून जायचं?
फुलायच्या प्रत्येक क्षणी नसून जायचं?

सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबतं का?
मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?

फुलून येते संध्याकाळ,रंगांची बाधा होते!
निळ्या निळ्या कृष्णासाठी अवघी सृष्टी राधा होते!

पाउस फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का?
मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?

ठुमरीच्या अंगाने झरा जेंव्हा वाहू लागतो.
लाल केशरी सरगम जेंव्हा फांदीवरून गाऊ लागतो!

झाडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का?
मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?

येणार असेल मरण तेव्हा येवू द्यावं
जमलाच तर लाडाने जवळ घ्याव!

हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का?
मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?

No comments:

Post a Comment