सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत
कि गाणं म्हणत?
तुम्हीच ठरवा!
डोळे भरून
तुमची आठवण
कोणीतरी काढतच ना?
उन उन
दोन घास
तुमच्यासाठी वाढतच ना?
शाप देत बसायचं
कि दुवा देत हसायचं?
तुम्हीच ठरवा?
काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसत,
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेवून उभ असत?
काळोखात कुढायचं
कि प्रकाशात उडायचं?
तुम्हीच ठरवा!
पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असत;
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसत?
काट्यासारखं सलायचं
कि फुलासारखं फुलायचं?
तुम्हीच ठरवा!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!
सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा!
Subscribe to:
Post Comments (Atom)
"काळ्याकुट्ट काळोखात
ReplyDeleteजेव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेवून उभं असतंच ना?" असे हवे
खूप छान
ReplyDeleteJust like this so much..
ReplyDeleteMost positive poem..👍