जरी तुझिया सामर्थ्याने
धलतिल दिशाही दाही
मी फुल तृणातील इवले..
उमलणार तरीही नाही
शक्तीने तुझिया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?
जिंकील मला दवबिंदू
जिंकील तरुणाचे पाते
अन स्वतःस विसरून वर
जोडील रेशमी नाते
कुरवाळत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करितील सजल इशारा
रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे
अन रंगांचे गंधाचे
मी गीत कसे गुंफावे?
शोधीत धुक्यातून मजला
दवबिंदू होवुनी ये तू
कधी भिजलेल्या मातीचा
मृदू सजल सुगंधित हेतू!
तू तुलाच विसरून यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे.... m>
Subscribe to:
Post Comments (Atom)
wow!
ReplyDeleteखूप च छान खूप आवडली
ReplyDeleteलहान पणीचे शाळेत असतानाचे दिवस या कवितेने आठविले. आमच्या वर्गातील हीच सर्वाँची आवडती कवीता होती.
ReplyDeleteही कविता वाचली आणि शाळेत आल्यासारखे वाटले. सरांनी उत्तम चाल लाऊन शिकवली होती. अजूननही पाठ आहे ही कविता. खुप सुंदर
ReplyDeleteMy favorite one. I still remember that on my oral examinations I said this poem which was loved by my teacher and she appriciated me. But I still loved this poem by heart. Actually this poem express real fillings about the person whom you loved by how he/she should be in your life. It may your parent or your husband or your children.
ReplyDeleteStill feel good when I read this poem...lahanpan de g Deva..
ReplyDeletewow..so nice..remembering those days..beautiful childhood days..very nice..thank you
ReplyDeletewow..so nice..remembering those days..beautiful childhood days..very nice..thank you
ReplyDelete7th LA hoti hi kavita mla aaj on sgl athvte karan kahi goshti kayam lakshat astat
ReplyDeletechhan ahe. vachun anand zala
ReplyDeleteChhan ahe
ReplyDeleteMajhya Athavnitil Kavita, khup khup abhar
ReplyDeleteLahanpaniche diwsas Ani tyavelchya Kavita man anandit Karun jatat
ReplyDeleteMazi sarwat avadti kavita ahe hi.. mala ajun path ahe
ReplyDeleteलहानपणी सगळ्यात जास्त आवडलेली कविता , माझी आवडती कविता . दपतर घेऊन जाणारे दिवस डोळ्या समोर आले.
ReplyDeleteKhup sundar.. Thank you for sharing here. Aamchya shikshakani tr sundar chal laun ajun jast sundar banavle aahe. I'm sorry, but ek correction aahet. Jinkil mala davbindu, jinkel trunache paate, an swatas visrun vaara jodil reshami naate.
ReplyDeleteशब्द नाहीत बोलण्या साठी,लहान पणाची आठवण आल्या वाचून राहत नाही.शाळेतील आठवनि ताज्या होतात
ReplyDeleteMazi sagalyat avadati Kavita ahe hi..
ReplyDeleteमराठीच्या सरांची आठवण आली त्यांनी ये मेरे वतन के लोगो या गाण्याची चाल लावली होती या कवितेला
ReplyDeletenice poem😎😎😎😎😎😎(✿)
ReplyDeleteamazing
Awesome Poem... Ajun pan paath aahe he kavita...
ReplyDeleteखूप च छान कविता आहे ही शाळेत शिकली होती माझी मुलगी आता इंग्लिश पोएम म्हणतीय् पण मथितार्थ काहिच् नाही अतिशय समृद्ध अशी हि कविता जगण्याचा दृष्टिकोन देते.माझी आज हि पाठ आहे
ReplyDeleteमाझी खूप आवडती कविता
ReplyDeleteखूप मस्त वाटलं आज ऐकून