ही रात्र कधीतरी सरते रे
आशेवर जीवन तरते रे
सुकलेल्या फांदीवर येती नवीन पाने
आणि वाटते तसे जगावे पुन्हा नव्याने
जळ पुन्हा ढगातून भरते रे
ही रात्र कधीतरी सरते रे
उजाड झाल्या मालावर वासंतिक वारे
आणि अचानक अंधारावर झुलती तारे
मौनातून गाणे झरते रे
ही रात्र कधीतरी सरते रे
काळोखाच्या काठावरती तांबूस चाहूल
रत्नांच्या पाण्यात उषेचे भिजते पाउल
प्राणात पाखरू स्फुरते रे
ही रात्र कधीतरी सरते रे........
Subscribe to:
Post Comments (Atom)
chaan!
ReplyDelete